Question 1 :
एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले?
Question 2 :
तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1000 रु आहे.त्यावर 25 % तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लिटर किती होईल ?
Question 3 :
एका परिक्षेत 70% विधार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विधार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विधार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाले. जर 3000 विधार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, तर त्या परीक्षेस एकूण किती विधार्थी बसले होते?
Question 4 :
एका गावची लोकसंख्या 3,630 आहे, ती दर 10 वर्षानी 10% ने वाढते; तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी?
Question 5 :
एका खोलीचे भाडे शे. 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनंतर शे. 25 ने वाढविले, तर मूळ भाडयात शेकडा वाढ किती झाली?
Question 6 :
साखरेची किंमत शे. 60 वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
Question 7 :
एका संख्या 12.5% नी वाढविल्यास 81 होते, तर ती संख्या कोणती?
Question 8 :
एका शहरामध्ये 65% लोक दुरदर्शनवरील बातम्या पाहतात, 40%लोक वर्तमानपत्र वाचतात,तर 25% लोक वर्तमानपत्रही वाचतात आणि दुरदर्शनही पाहतात. तर या शहरातील किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचत नाहीत आणि दुरदर्शनाही पाहत नाही ?
Question 10 :
राम चा पगार श्यामच्या पगाराच्या 25 टक्के आहे तर श्याम चा पगार आमच्या पगाराच्या किती टक्के आहे
Question 11 :
जर X चे उत्पन्न् Y च्या उत्पन्नाहुन 50% कमी असेल. तर Y चे उत्पन्न् X च्या उत्पन्नाहुन किती% जास्त् आहे ?
Question 12 :
एका गावात मराठी जाणणारे 82% हिंदी जाणणारे 76% लोक असुन दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहे जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असल्यास त्या गावची लोकसंख्या किती ?
Question 13 :
150 चा शेकडा 60 काढुन येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Question 14 :
एका गावची लोकसंख्या 10000 आहे ती पहिल्यावर्षी 10% नी वाढते दुसऱ्या वर्षी 20%नी कमी होते परत तिसऱ्या वर्षी 30% वाढते तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल ?11000
Question 15 :
एका वस्तुच्या करांच्या दरात 10% घट केली आणि तिच्या खपात 10% वाढ झाली ह्याने महसुल प्राप्तीनंतर काय परिणाम होईल ?
Question 16 :
दुधाच्या मुल्यात 10% घट झाल्यावर तिच्या खपात किती % वाढ करावे लागेल की त्या दुधावरील खर्चात काही बदल होणार नाही.
Question 17 :
एका संख्येचे 12.5% = 37.5 तर त्या संख्येचे 37.5% = ?
Question 18 :
साखरेची किंमत शे.60 ने वाढली तर घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हण्जे खर्चात वाढ होणार नाही?
Question 19 :
चहाच्या किंमती 30% कमी झाल्यास त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यास किती % जास्त् खरेदी करावी ?
Question 21 :
एक डेक्स आणि एक खुर्ची यांची एकूण किंमत 460 रुपये आहे डेक्स ची किंमत खुर्ची पेक्षा 30 टक्क्याने जास्त आहे तर खुर्ची ची किंमत काढा?
Question 22 :
एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 12000 रु आहे तो घरखर्चासाठी 40% शिक्षणासाठी 5% औषधावर 15%, किरकोळ खर्चासाठी 1600रु वापरतो व शिल्लक बँकेत ठेवतो. तर तो मासिक उत्पन्नाच्या कितीपट रक्कम बँकेत ठेवतो ?
Question 23 :
एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 40% घरखर्च,उर्वरीत रक्कमेच्या 60% प्रवासावर , उर्वरीत रक्कमेच्या 50% जेवणावर खर्च करतो शेवटी त्याच्याकडे 600 रु शिल्लक राहतात. तर त्याचा मासिक पगार किती ?
Question 24 :
दोन संख्या एका तिसऱ्या संख्येच्या तुलनेत 10% आणि 25% कमी आहेत दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येच्या बरोबर करण्यासाठी किती % वाढवावे लागेल ?
Question 25 :
जर A,C पेक्षा 50% ने मोठा व B,C पेक्षा 25% ने मोठा आहे तर A,B पेक्षा किती % ने मोठा आहे?
Question 26 :
एका परीक्षेत विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान 33% अंक मिळवायचे आहेत. एका विदयार्थ्यांने 125 अंक प्राप्त् केले आणि 40 अंकानी नापास झाला, परीक्षेचे कमाल अंक किती होते?
Question 27 :
एका परीक्षेत अशोकला 25% गुण मिळाले पण तो 30 गुण कमी मिळाल्यामुळे नापास झाला, प्रविणला त्याच परीक्षेत 50% गुण मिळाले पण त्यास पास होण्यास आवश्य्क गुणापेक्षा 20 गुण अधिक मिळाले तर पास होण्यास किती गुण पाहिजेत ?
Question 28 :
30 ली. मिश्रणात 60% अल्कोहोल आहे, तर 20% अल्कोहोल साठी मिश्रणात किती लीटर पाणी टाकली पाहिजे?
Question 29 :
एका 9 लीटर पाणी व मीठ याच्या द्रावणात 50% मिठाचे प्रमाणे आहे त्यात किती लीटर पाणी टाकावे, ज्यामुळे नवीन द्रावणात मिठाचे प्रमाण 30% होईल ?
Question 31 :
एका निवडणुकीत उभे असलेल्या दोन उमेद्वारापैकी ज्याला 40% मते मिळाली तो 25050 मतांनी हरला तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली?
Question 32 :
एका निवडणुकीत दोन उमेदवार होते . हया निवडणुकीत 8% मतदाराने आपल्या मताचा प्रयोग केला नाही.जिंकलेल्या उमेदवाराने एकूण मताच्या 48% मते मिळवली आणि दुसऱ्या उमेदवाराला 1100 मतांनी पराजीत केले ह्या निवडणुकीत एकूण मतदार किती होते?
Question 33 :
दोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेद्वाराला 30% मते मिळाली, तो 14400 मतांनी हरला तर विजयी उमेदवाराला एकूण किती मते मिळाली ?
Question 34 :
10% आणि 20% ची सतत सुट …………च्या एकल सुटच्या सममुल्य् आहे.
Question 35 :
सीताला एका परीक्षेत 25 % गुण मिळाल्याने ती 35 गुणांनी नापास झाली तर गीताला 29 % गुण मिळाल्याने ती 23 गुणांनी नापास झाली तर परीक्षा पास होण्यासाठी किती गुण आवश्यक होते?
Question 38 :
एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षी 10 टक्क्यांनी वाढली दुसऱ्या वर्षी 20 टक्क्याने वाढून 528 इतकी झाली तर दोन वर्षांपूर्वी शाळेची विद्यार्थी संख्या किती?
Question 39 :
एक व्यापारी दरवर्षी त्याच्या उत्पन्नाच्या 4.5% देवधर्मा साठी 10.5 % शिक्षणासाठी 6.8 % मुलांसाठी आणि 3.2 %नोकरीसाठी खर्च करतो जर त्याचे वार्षिक उत्पन्न 30000 नि वाढले तर त्याचा वरील बाबींवरील खर्च किती ने वाढेल?
Question 40 :
एक व्यक्ती एक वस्तू एका वर्षात विकत घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला काही रक्कम बचत करतो जर त्याला ती वस्तू दहा महिन्यात विकत घ्यायचे असेल तर बचत किती टक्क्याने वाढवावी लागेल?
Question 41 :
360 च्या 80% + 200 च्या 20% - x = 116
Question 42 :
20 च्या 30% व 30 च्या 20% यांची बेरीज बरोबर आहे.
Question 43 :
नाटकाचे तिकीट पाच रुपये होते ते 20 टक्क्याने कमी केल्यामुळे तिकीट विक्रीची रक्कम 44 टक्क्याने वाढली तर दर्शकांची संख्या किती टक्क्याने वाढली?
Question 44 :
A हा B च्या 5% आहे. मग B हा A किती % आहे?
Question 45 :
एक एका गाव ची सध्याची लोकसंख्या 60500 आहे आणि ती दरवर्षी 10% ने वाढते. तर त्या गावची दोन वर्षापूर्वी लोकसंख्या किती असेल?
Question 46 :
एका शाळेत 60 टक्के मुलं आहेत व 972 मुली आहेत तर मुलांची संख्या सांगा?
Question 47 :
एका संख्येमध्ये 64 मिळवले असतात ती संख्या 157 पूर्णांक 1/7% होते तर ती संख्या कोणती?
Question 48 :
A ला B पेक्षा 40% गुण जास्त मिळाले जर B ला 420 गुण मिळाले तर A ला किती गुण मिळाले?
Question 49 :
24 रुपयात 16 फळे खरेदी करून 18 रुपयाला 8 फळे विकल्यास शेकडा नफा किती?
Question 50 :
15 वस्तूची खरेदी किंमत 10 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे शेकडा नफा काढा?